जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील इच्छादेवी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवार २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता देशद्रोही दाऊद इब्राहिमचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला तर राष्ट्रवादीचे नवाब मलीक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील इच्छादेवी चौकात मेहरूण येथील भारतीय जनता पार्टी मंडळ क्रमांक ८ च्या वतीने देशद्रोही दाऊद इब्राहिमचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी भाजपाचे मंडळाध्यक्ष विनोद मराठे यांनी सांगितले की, देशद्राही दाऊद इब्राहिम हा मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात मुख्य सुत्रधार आहे. या दाऊद इब्राहिम याने ३०० कोटींची मालमत्ता कमी किंमतीत बळकावली असल्याने ती मालमत्ता खरेदी करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांचा हात आहे. त्यामुळे नवाब मलीक यांना ईडीने अटक केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी आपली नैतीकता दाखल आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. याप्रसंगी भाजपाचे मंडळाध्यक्ष विनोद मराठे, सरचिटणीस मोनाली सोनवणे, रमेश मोची, ज्योती बेंद्रे, कोकीळाबाई मोरे, बाळू वाणी, कोकीळा ढगे, गजानन वंजारी, तुळशीराम वाणी, मिनाताई निकुंभ, प्रमोद मोरे, संपत कोळी यांच्यासह आदी उपस्थित होते.