नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाच्या राजकारणात अतिशय महत्वाच्या असणार्या उत्तरप्रदेशसह गोवा मध्ये भाजप आघाडीवर असून पंजाबमध्ये मात्र आप आघाडीवर असून उत्तराखंडमध्ये भाजप व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होत असल्याचे प्राथमिक कल आज समोर आले आहेत.
अलीकडेच उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी आजपासून सुरू झाली. यातील मणीपूर वगळता अन्य चारही राज्यांचे प्राथमिक कल समोर आले आहेत.
सकाळी साडेआठच्या सुमारास उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्ष ११० तर समाजवादी पक्ष ६५ जागांवर आघाडीवर असल्याचे कल समोर आले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मुसंडी मारली असून येथे आप ३२ तर सत्ताधारी कॉंग्रेस १८ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. गोव्यात भाजप ३ तर कॉंग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. साधारणपणे एक तासात पाचही राज्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.