एरंडोल प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पक्षातर्फे दूध दरवाढीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
एरंडोल येथे आज महाएल्गार आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करोना च्या काळात जनतेला व शेतकर्यांना वार्यावर सोडून दिले आहे. सरकारने जनतेला कोणतीही मदत केली नाही.राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.दुधाला सरसकट प्रति लिटर पाच रुपये अनुदान,दूध मुक्ती निर्यातीवर ५० रुपये अनुदान द्या, दूध खरेदीचा दर प्रति लिटर ३० रुपये द्या अशा प्रकारच्या मागण्या आज आंदोलन प्रसंगी करण्यात आल्या. यावेळी सर्वांनी मास्क लावलेले होते तसेच मोजके कार्यकर्ते असल्याने फिजिकल डीस्टन्सींगचा अभाव होता.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रास्ता रोको मात्र टाळला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी एरंडोल तालुक्याच्या वतीने एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी,ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष अशोक चौधरी, संजय गांधीचे माजी अध्यक्ष सुनील पाटील, तालुका सरचिटणीस अमोल जाधव,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, संजय साळी, राजेंद्र पाटील,सचिन पाटील, बाजीराव पांढरे,नगरसेवक नितीन महाजन,शाम ठाकूर, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत महाजन यावेळी उपस्थित होते.