चोपड्यातील महावीर पतसंस्थेच्या चौकशीपत्राला व्यवस्थापकाकडून केराची टोपली

चोपडा प्रतिनिधी । येथील महावीर नागरी सह. पतसंस्थेचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लतीश जैन यांनी चव्हाट्यावर आणले आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणाचा चौकशी संदर्भातील कमकाज सहा.निबंधक जी.एच.पाटील यांना देण्यात आले होते. चौकशी अंतर्गत दिलेल्या पत्राला पतसंस्थेचे व्यवस्थापकांनी केराची टोपली दाखवली आहे.

सविस्तर असे की, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लतीश जैन यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावर जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांनी महाराष्ट्र अधिनियम कायदा कलम 89 अ प्रमाणे चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीसाठी अमळनेर येथील सहा.निबंधक जी.एच. पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार जी.एच. पाटील यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी लतीश जैन यांनी संस्थापक चेअरमन, विद्यमान चेअरमन यांच्या व नातेवाईकांचा पुराव्यासह थकीत कर्जाची यादी दिली होती. त्यावर जी.एच.पाटील यांनी सखोल चौकशी करून दस्ताऐवज (नक्कला) मिळवून दयायचे होते. परंतु जी.एच.पाटील यांनी सदरील दस्तऐवज आपण संस्थेतून घ्यावे असे, पत्र लतीश जैन यांना देण्यात आले व त्याची एक प्रत पतसंस्थेच्या व्यवस्थापक राजेंद्र शांतीलाल जैन यांना देण्यात आली होती. त्यापत्रावर व्यवस्थापक जैन यांची स्वाक्षरी देखील आहे. तक्रारदाराने पुराव्यासह दस्तऐवज पुरवल्यानंतर देखील जी.एच.पाटील यांनी काही गंभीर मुद्यावर सखोल चौकशी न करता 89 अ च्या अहवाल सादर करण्यात आले. संबंधित पत्राप्रमाणे कोणतेही माहिती पुरविण्यास व्यवस्थापक तयार नाही. भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे देऊन सुद्धा व्यवस्थापक राजेंद्र जैन यांची इतकी मुजोरी की, चौकशी अधिकाऱ्यांच्या पत्राला देखील केराची टोपली दाखवली आहे. चौकशी अधिकारी जी.एच.पाटील यांनी जरी काही मुद्यावर गंभीर दखल घेतली असली, तरी काही मुद्दे सोयीस्करपणे टाळल्याचे दिसते. याबाबत तक्रारदाराने पुणे येथील आयुक्त कार्यालयात सविस्तर लेखी तक्रार केली आहे न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहील असे तक्रारदार लतीश जैन यांनी बोलताना सांगितले.

Protected Content