जळगाव, प्रतीनिधी | नाशिक विभागीय नेहरू चषक आंतर शालेय १५ वर्ष आतील हॉकी स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगावच्या वतीने क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण ७ संघानी सहभाग घेतला होता. यात जळगाव २,नाशिक २,धुळे, मालेगाव व नंदुरबार प्रत्येकी १ संघ होता. संघ व खेळाडूस बक्षीसे स्पर्धेतील विजेते व उप विजेते संघास ट्रॉफी व दोन्ही संघातील खेळाडूंना व्यक्तिगत मेडल स्पोर्ट्स हाउसचे आमीर शेख यांनी दिले. पारितोषिक वितरण बुद्धीबळ राष्ट्रीय विजेती भाग्यश्री पाटील, शिव छत्रपती पुरस्कार अंजली पाटील, हॉकी महाराष्ट्राचे फारूक शेख व स्पोर्ट्स हाउसचे आमीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन लियाकत अली यांनी तर आभार क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर यांनी मानले.