हिंगोणा जिल्हा परिषदच्या ऊर्दू शाळेत शालेय ‘पोषण आहार’ अंतर्गत विदयार्थांना बिस्कीट वाटप

यावल प्रतिनीधी | तालुक्यातील हिंगोणा येथील जिल्हा परिषदच्या ऊर्दू शाळेत शासनाच्या शिक्षण विभागाने पाठवलेल्या शालेय पोषण आहार कार्यकमा अंतर्गत विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले.

त्यात इयत्ता १ ली ते ५वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ७ पुडे तर इयत्ता ६ वी ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ९ बिस्कीटाची पाकिटं वाटप करण्यात आली. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष मुख्तार शेख यांच्याहस्ते पोषण आहार वाटप करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अहमद खान, हाजी युसुफ अली, आसीप जनाब, अली मोहम्मद, सल्लाउद्दीन फारुकी, शालेय समितीचे सदस्य शब्बीर खान यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

 

Protected Content