यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लालपरी म्हणून ख्यात असणार्या एस.टी. बसचा अमृत महोत्सवी वाढदिवस यावल बसस्थानकात मोठ्या उत्साहामध्ये पार पडला.
महाराष्ट्र राज्यातील खेडे असो किंवा शहरी भाग सर्वांना सुखरूप आपल्या गावी आपल्या घरी सोडणारी व महाराष्ट्रच्या नागरीकांच्या दळणवळणाचे एक मोठे साधन म्हणजे लालपरी ( एसटी ) होय ! सन् १९४७ मध्ये भारतातील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली व आपल्या राज्यात प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी पब्लीक ट्रासपोर्ट एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला. बीएसआरटीसीची पहिली बससेवा १ जुन१९४८या दिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली या एसटी बससेवेचे चातक होते तुकाराम पांडुरंग पठारे तर वाहक होते लक्ष्मण कलटे यांनी ही बस चालवली होती. आपल्या राज्यात लाल डब्यापासुन लालपरी असे विविध नांवे असलेली एसटी ही सर्वांच्या परिचयाची आहे . अशा सर्वांच्या आवडत्या लाल परीही आता ७५ वर्षाची झाली आहे .
अशा प्रकारे सर्वांना प्रिय वाटणारी आपल्या लालपरी चा ७५ वा वर्धापन अमृत महोत्सव वर्ष यावल आगार येथे मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने शनिवारी एस.टी.आगारात यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी एसटीतुन प्रवाशी करणार्या प्रवाशी बांधवांना गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले तर प्रवाशांकडून देखील लालपरीच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर जेष्ठ प्रवाशी यांच्या हस्ते लालपरीचे पुजन करण्यात आले.
यावेळी यावलच्या बसस्थानकावर प्रवाशांच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी काढून तोरण ,फुलहार लावण्यात आले.
यावेळी आगारातील पर्यवेक्षकीय कर्मचारी चालक, वाहक, यांत्रिककर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी ,पत्रकार बांधव व प्रवाशी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विजय पाटील, वाहतूक निरीक्षक वानखेडे ,आगार लेखाकार बारसे ,चालक डिगंबर सोनवणे , व इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.