
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणारे दुचाकीस्वार दुभाजकावर आदळून अपघात झाला होता. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता तर दुसरा अभिषेक हरिप्रसाद शर्मा (रा. निमखेडी शिवार) याचा मृत्यू झाल्याची घटना दुध फेडरेशनजवळ घडली होती. याप्रकरणी मयताविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील निमखेडी शिवारात राहणारा पवन देविदास सोनवणे हा तरुण त्याचा मित्र अभिषेक शर्मा हे १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता दुचाकीने दूध फेडरेशनजवळून जात होते. यावेळी स्पिड ब्रेकरवरुन त्याची दुचाकी उधळून ते दुभाजकावर आदळली. यामध्ये दोघ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यावेळी अभिषेक शर्मा याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता पवन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मयत अभिषेक हरीप्रसाद शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे हे करीत आहे.



