भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव आणि पारोळा तालुक्यात दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला गाळण येथून भडगाव पोलिसांनी सोमवारी 16 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आले आहे. अटकेतील संशयित आरोपीकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील तळवण तांडा येथील नाना राठोड यांची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहायक फौजदार हिरालाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार ही दुचाकी संशयित आरोपी उमेश बबन पाटील (रा. गाळण ता. पाचोरा) यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भडगाव पोलिसांनी सोमवारी 16 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता कारवाई करत दुचाकी चोर उमेश पाटील याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने भडगाव आणि पारोळा तालुक्यातून चोरी केलेल्या एकूण 5 दुचाकी काढून दिल्या. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील, निलेश ब्राह्मणकर, सुनील राजपूत, प्रवीण परदेशी, कुंदन राजपूत यांनी केली आहे.