नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक येथील मुंबई-आग्रा महामार्गावर अमृतधाम चौफुली येथे पाठीमागून आलेल्या घंटागाडीने महिलेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असता, दुचाकीस्वार महिला रस्त्यावर पडली. या घंटागाडीच्या चाकाखाली आल्यामुळे चिरडून महिलेचा करूण अंत झाला. ही मयत महिला के. के. वाघ महाविद्यालयाची प्राध्यापिका असल्याची माहिती मिळालेली आहे. या घटनेतील जबाबदार असलेल्या संशयित घंटागाडी चालकाला घंटागाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात घंटागाडी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत दुचाकीस्वार महिलेचे प्रा. विनिता रामचंद्र कुयटे (२७, रा. मखमलाबाद रोड) असे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात घंटागाडी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. प्रा. विनिता कुयटे या त्यांच्या दुचाकीने (एमएच १५ डीजी १२६१) सकाळी के. के. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाल्या. महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर त्या वळण घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या घंटागाडीने त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे त्या दुचाकीवरून खाली पडल्या असता घंटागाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा इस्पितळात दाखल केला असता, तपासून वैदयकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. कुयटे या अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मयत प्राध्यपिकांनी यावेळी डोक्यात हेल्मेटही घातलेले होते.