भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद-भोकर रस्त्यावर भरदार डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजात घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात डंपरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, चंद्रभान तोताराम सोनवणे रा. आमोदा ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चंद्रभान सोनवणे हे त्यांच्या दुचाकीने किनोद-भोकर या रस्त्याने गाडीकडे जात असताना समोरून येणारे डंपर क्रमांक (एमएच १९ झेड १६४२) जोरदार धडक दिली. या धडकेत चंद्रभान सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत त्यांचा भाचा भगवान कोळी यांनी गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून डंपरवरील अज्ञात चालकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे हे करीत आहे.

Protected Content