भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरापासून जवळ असलेल्या येथील राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे ओव्हरब्रिजजवळ मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता ट्रक आणि मोटरसायकलच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वराला भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर दाखल करण्यात आले. या संदर्भात पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक (GJ 36 T 6218) हा भुसावळकडून जळगावच्या दिशेने जात असताना रेल्वे ओव्हरब्रिज जवळील भावे गल्ली येथील राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकच्या समोर दुचाकी अडकले आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या वाहतुकीमुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या संदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.