भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगातील पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढव्यातील केशवनगर भागात घडली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी संबधित टँकरचालकाला अटक केली आहे. अथर्व संजय कुंभार असे मयत झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी टँकरचालक संतोष शिवसेवक सिंह याला अटक करण्यात आली. याबाबत अथर्वचा मित्र अमन चौधरी याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अथर्व रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंढव्यातील रेणुकामाता मंदिर परिसरातून निघाला हाेता. त्यावेळी पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वार अथर्वला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अथर्वला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. टँकरचालकाला पोलिसांनी अटक केली असून, पाेलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे पुढील तपास करत आहेत.

Protected Content