वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील हतनुर गावातील गौरव हॉटेल समोर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात रसलपूर येथील तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद अफसर सैय्यद सफदर रा. रसलपूर ता.रावेर हे आपल्या दुचाकीने भुसावळ तालुक्यातील हतनुर गावाजवळीन गौरव हॉटेल समोरून जात असतांना अचानक दुचाकीवरील ताबा सुटला. त्यात दुचाकी पलटी झाल्याने सैय्यद अफसर हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरूवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. त्याला तातडीने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालविल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीधारक सैय्यद अफसर याच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नवीद अली सैय्यद करीत आहे.