अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील लोकमत कार्यालयासमोर अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघात प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर विजय घुगे (वय-३१) रा. जेल रोड नाशिक, ह.मु. कालिंका माता मंदिर परिसर, जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक येथील रहिवासी असलेला किशोर घुगे हा तरुण जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. मंगळवारी ४ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास किशोर घुगे हा त्याची दुचाकी (एमएच १५ एफके ८९५) वरून एमआयडीसीतील लोकमत कार्यालयासमोरून जात होता. त्यावेळी दुचाकी मागून भरधाव वेगाने येणारी चारचाकी वाहन क्रमांक (एमएच ४८ एजी ८६४५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत किशोर घुगे याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत किशोर घुगे याचे नातेवाईक अमोल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार ५ जुलै रोजी रात्री ८ वाजता (एमएच ४८ एजी ८६४५) या वाहनावरील अज्ञात चालका विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.

Protected Content