भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पांडूरंग टॉकीज जवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे एका ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. दिपक कृष्णा पाटील वय ५५ रा. पियुष कॉलनी, भुसावळ असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील पियुष कॉलनीत दिपक पाटील हे प्रौढ व्यक्ती वास्तव्याला होते. शुक्रवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता दिपक पाटील हे कामाच्या निमित्ताने घरून दुचाकीने निघाले होते. भुसावळ शहरातील पांडूरंग टॉकीजजवळ त्यांची दुचाकी अचानक रस्त्यावर घसरली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या त्यांना तातडीने गोदावरील हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.