जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ रस्त्यावरील हॉटेल त्रिमुर्तीजवळ भरधाव दुचाकी उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे.
हरेश्वर गोपाळ चौधरी (वय-५५) रा. भादली ता.जि.जळगाव असे मृत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव तालुक्यातील भादली येथील रहीवासी हरेश्वर चौधरी हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह वास्तव्याला आहे. जळगाव एमआयडीसीतील एका बॉयलर कंपनीत कामाला आहे. आज शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ बीएल २८९९) ने निघाले. जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल त्रिमुर्ती जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उभ्या कंटेनर (एचआर ३८ ए ७२२२) ला जोरधार धडक दिली. या अपघातात हरेश्वर चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मालतीबाई, मुलगा वैभव आणि विवाहित मुलगी सुवर्णा असा परिवार आहे.