मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाने मुंबई उत्तर मध्य येथून जळगावचे थोर सुपुत्र तथा ख्यातनाम विधीज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राज्याचे विशेष सरकारी वकील तथा ख्यातनाम विधीज्ज्ञ ॲड. उज्वल निकम हे राजकारणात एंट्री करणार असल्याचे कधीपासून मानले जात होते. आधी त्यांचे नाव जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून चर्चेत आले होते. मात्र त्यांनी याचा इन्कार केला होता. यानंतर जळगावातून त्यांचे पुतणे रोहित निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती मात्र त्यांनाही तिकिट मिळाले नाही.
दरम्यान, उज्वल निकम यांना मुंबईतल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. महायुतीने राज्यातील सर्व जागांवरील उमेदवार जाहीर केले असले तरी येथून उमेदवारी जाहीर केली नव्हती. आज मात्र या जागेवरून उज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे जळगावचे थोर सुपुत्र आता मुंबईतून लोकसभेत जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.