मोठी बातमी : रस्त्यावर दुचाकी आडवून दोघांना लुटले; २ लाखांची रोकड घेवून दरोडेखोर पसार !

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पळासखेडा ते गुजरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका फायनान्स कंपनीची वसुली करणाऱ्या दोन जण रस्त्याने जात असतांना दुचाकी आडवून जीवेमारण्याची धमकी देत जवळील २ लाख ७ हजारांची रोकड अज्ञात दरोडेखोरांनी लांबविल्याची घटना बुधवार १२ जून रोजी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश राधेश्याम यादव आणि दिपक सुरडकर हे दोघे नम्र फायनान्स लिमीटेड कंपनीत नोकरीला आहे. बुधवारी १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता ते वसुलेचे पैसे घेवून दुचाकी एमएच १९ सीटी ३३९० ने पळासखेडा हून गुजरी गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी रस्त्यावर अज्ञात सहा जणांनी दोघांची दुचाकी आडविली. व जिवेठार मारण्याची धमकी देवून त्यांच्या जवळील २ लाख ७ हजारांची रोकड जबरी हिसकावून लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १३ जून रोजी मध्यरात्री २ वाजता फत्तेपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात सहा जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची पुढील तपास सपोनि गणेश फड हे करीत आहे.

Protected Content