नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख यांनी सुप्रीम कोर्टाने दारू घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने १ जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यासोबतच अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुभा दिली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरूंगातून सुटका होणार आहे. दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. दिल्लीमध्ये लोकसभेच्या ७ जागा असून आम आदमी पक्ष हा ४ जागा लढत आहे. यासोबतच तो राजस्थान, पंजाबमध्येही लोकसभेच्या जागा लढत आहे. सुप्रीम कोर्टाच्या संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. २ जून रोजी त्यांना पोलिसांकडे आत्मसमर्पण करावे लागेल असे आदेश कोर्टाने दिले आहे.
त्यांना ईडीने दारू घोटाळा प्रकरणी २१ मार्च रोजी अटक केली होती. केजरीवाल तुरुंगात असताना त्यांचे कार्यकर्ते, नेते सुटकेसाठी प्रयत्न करत होते. कोर्टाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कार्यकर्ते, नेत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीने सुप्रीम कोर्टात विरोध केला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकतात. पत्रकार परिषद घेऊ शकतात अशी मुभा सुप्रीम कोर्टाने त्यांना दिली आहे. केजरीवाल आम आदमी पार्टीचा मोठा चेहरा आहेत.