मोठी बातमी ! मंत्री कैलास गहलोत यांची ‘आप’ला सोडचिट्टी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीचे मंत्री कैलाश गेहलोत यांनी केजरीवाल यांना पत्र पाठवून त्यांच्या पदाचा राजीनामा आणि आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राजीनामा पत्रात त्यांनी यमुना स्वच्छता आणि शीशमहलच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेहलोत यांनी पत्रात लिहिले की, आम्ही गेल्या निवडणुकीत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु स्वच्छता झाली नाही. आम्ही आमचे आश्वासन पूर्ण करू शकलो नाही.

परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या मंत्रिपदाचा तसेच ‘आप’च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्या प्रामाणिक राजकारणामुळे आम्ही आप पक्षात आलो ते आता होत नसल्याचा आरोप गेहलोत यांनी पत्रात केला आहे. पक्षाचे निमंत्रक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानाला ‘शीशमहल’ म्हणत त्यांनी अनेक आरोपही केले आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मंत्री आणि आप नेते कैलाश गेहलोत यांनी आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. पत्रात असे लिहिले आहे की, ‘शीश महालासारखे अनेक लाजिरवाणे आणि विचित्र वाद आहेत. जे आता सर्वांच्याच मनात शंका निर्माण करत आहेत. सामान्य माणूस म्हणून विश्वास आहे की नाही? यागोष्टींवरून स्पष्ट झाले आहे की दिल्ली सरकार आपला जास्तीत जास्त वेळ केंद्राशी लढण्यात व्यतीत करत आहे. काम होत नाही. त्यामुळे माझ्याकडे ‘आप’पासून फारकत घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

Protected Content