शेततळ्यातील कापड फाडून शेतकऱ्याचे मोठे नुकसान; पोलीसात गुन्हा दाखल

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील मुंदाणे शिवारातील शेतात असलेल्या १० ते १५ शेतकऱ्यांचे शेततळ्यातील प्लास्टिक पेपर फाडून चोरून नेत शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान केल्याची २ जून रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे अभिमान पुंडलिक पाटील वय-६५ हे शेतकरी वास्तव्याला आहे. त्यांचे मुंडाणे शिवारातील शेत गट नंबर 102 मध्ये शेत आहे. या शेतात ते पिकांना पाणी देण्यासाठी शेततळे बनविले आहे. या शेततळ्यात प्लास्टिक पेपरचा वापर केलेला आहे. दरम्यान १ जून रोजी सायंकाळी ६ ते २ जून सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने या शेतातील प्लास्टिकचे पेपर कापून काढून नुकसान केले आहे. तसेच काही वस्तू चोरून नेले आहे. यासह याच भागातील काही १० ते १५ शेतकऱ्यांचे शेततळ्यातील प्लास्टिक पेपर काढून नुकसान केले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर शेतकरी अभिमान पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी डोंबाळे यांना देखील निवेदन दिले आहे. याप्रसंगी शेतकरी अभिमान पाटील, सुपडू पाटील, मच्छिंद्र पाटील, शरद पाटील, विठ्ठल पाटील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Protected Content