जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अज्ञातवासात असलेला एक बडा नेता येत्या 30 जुलैला राष्ट्रवादीत प्रवेश करणार, या आशयाची फेसबुक पोस्ट राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी आज सायंकाळी टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करणारा तो नेता कोण ? याबाबत चर्चेला उधान आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी आज सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केली आहे. देसले यांनी त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ‘#ब्रेकिंग…..जळगाव जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ व सध्या अज्ञातवासात असलेला एक नेता येत्या 30 जुलैला राष्ट्रवादीत प्रवेश करणार..! ‘ या पोस्टमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, देसले यांनी सूचकरित्या पोस्ट टाकल्यामुळे ‘तो’ नेता कोण? हे लक्षात येत नाहीय. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी फक्त ‘वेट ॲण्ड वॉच’ अशी प्रतिक्रिया देत अधिक बोलण्यास नकार दिला.