बिग ब्रेकींग : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेत विधानसभा निवडणुक न लढविण्याची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतील अर्ज माघारीसाठी काही तास उरलेले असतांना रात्री उशीरा आपली भूमिका जाहीर केली. यात त्यांनी 26 जागांवर आपले उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. उमेदवारांची नावे ते नंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी रात्री सांगितले होते. तर आज सकाळी त्यांनी याच्या अगदी विरोधात भूमिका घेतली.

दरम्यान, आज सकाळी नऊ वाजता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी समाजबांधवांच्या सोबत चर्चा करून आपण निवडणुकीत उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, एकाच जातीवर कुणीही निवडून लढवू शकत नाही. यामुळे आम्ही यंदाच्या निवडणुकीत कुणालाच पाठींबा देणार नसल्याचे स्पष्ट केले.

Protected Content