मुंबई प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाने विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केल्याने सत्ता स्थापनेचा पेच अजून वाढला आहे.
भाजपच्या कोअर समितीची बैठक पार पडल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी आपला पक्ष सत्ता स्थापन करणार नसल्याची घोषणा केली. याप्रसंगी ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने महायुतीला महाजनादेश दिला. यामुळे जनादेशाचा अनादर करून शिवसेनेशिवाय आम्ही सत्ता स्थापन करणार नाहीत. तथापि, शिवसेनेला जर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार बनवायचे असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा असल्याचेदेखील प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील आणि अन्य ज्येष्ठ भाजप नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. तथापि, त्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा पाहता आता सत्ता स्थापनेच्या घडामोडी नवीन वळणावर आल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.