मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने शेतकर्यांसाठी मदत जाहीर केली आहे.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात शेतकर्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आली याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. ते म्हणाले की, राज्यात १५ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकर्यांच्या मागणीनुसार, त्यांना दिलासा देण्यासाठी एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घषण्यात आली आहे. दोन हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती ३ हेक्टर केली आहे. हा एक मोठा निर्णय आम्ही घेतलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे ६ हजार ८०० मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत. म्हणजे प्रतिहेक्टर १३६०० रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली असून यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.