बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने आरपीआय आठवले गटाकडून अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी | थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती आरपीआय आठवले गटाकडून साजरी करण्यात आली.

 

आदिवासी क्रांतिकारक थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. श्री. अडकमोल यांनी बिरसा मुंडा कार्याला उजाळा दिला. बिरसा मुंडा यांनी पाणी, जंगल आणि भूमिसाठी आदिवासी समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. एकोणिसाव्या शतकातील बिरसा मुंडा हे महान स्वातंत्र्य सेनानी होते. ते चळवळीत सक्रीय होते. आदिवासींवर होत असलेल्या ब्रिटीश दडपशाही विरुद्ध बिरसा मुंड यांनी मोठा लढा दिला होता. यावेळी जिल्हा सचिव भरत मोरे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, संघटक अनिल लोंढे, किरण अडकमोल, हरीष शिंदे, संदीप तायडे, नरेंद्र मोरे, अक्षय मोरे, प्रदीप देशमुख, सागर अहिरे, दिनेश बडगुजर, आशिष पाटील यांच्या सह कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Protected Content