बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| 3 जुन हा दिवस सर्वत्र जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या वतीने जळगाव जामोद शहरात सायकल रॅली काढून व नागरिकांमध्ये सायकल चालवल्याने आरोग्य विषयक फायदे याची जनजागृती करून साजरा करण्यात आला.
जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या 50 सदस्यांनी शहरातील मध्यवर्ती भागातून जनजागृती करत सायकल काढली. आजच्या रॅली मध्ये विशेष करून जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री.महाजन साहेब तसेच जळगाव जामोद वनविभागाचे अधिकारी नीलेश काळे
सायकल सह सहभागी झाले होते.
दैनंदिन जीवनात सध्या सायकलचा वापर कमी होत चाललाय मात्र नियमित सायकलिंग केल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते व रक्तदाब नियमित राहतो. रोज किमान 25-30 मिनिटे सायकलिंग केल्याने हैप्पी हार्मोन्स सक्रिय होतात त्यामुळे दिवसभर मन प्रसन्न राहते.
त्यामुळे सर्वांनी स्वतः साठी स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी दिवसातून किमान 25-30 मिनिटे तरी सायकलिंग करावे असे आव्हान जळगाव जामोद सायकल ग्रुपच्या वतीने शहर वासियांना करण्यात आले.