जळगाव, प्रतिनिधी | निवडणुकीसंदर्भात चर्चा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी. आय (आ.), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती, महायुतीचे उमेदवार व शहराचे आ. सुरेश भोळे यांच्या संपर्क कार्यालयास आज सोमवार दि. ७ ऑक्टोंबर रोजी भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष भूषणसिंग राजे होळकर यांनी आज भेट दिली.
अहिल्याबाई होळकर घराण्याचे भूषणसिंग राजे होळकर यांनी विधानसभा निवडणुकीविषयी आ. सुरेश भोळे यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, लवकरच जळगाव शहरामध्ये धनगर समाजाच्या लोकांशी भेटून ओबोसी समाजाचे मेळावे आयोजित करणार आहोत. ते पुढे म्हणाले की, आ. भोळे काम अतिशय चांगले असून केंद्र व राज्य सरकारने ओबीसी व धनगर समाजासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. भोळे हे सुद्धा ओबोसी समाजाचे नेतृत्व करणारे आमदार असून जळगाव शहराच्या सर्वसामान्य जनतेशी भोळे यांचे नाते सलोख्याचे आहे असे म्हणतभोळे यांचे काम अतिशय प्रशंसनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीप्रसंगी भूषण राजे होळकर यांच्यासोबत त्यांचे सहकारी दिलीप माने, माजी नगरसेवक शेगाव, अशोक रिटे पाटील, शहरी इतिहास संशोधन केंद्र सभासद सुभाष सोनावणे आदि उपस्थित होते.