आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन निबंध स्पर्धेत भुषण भवर प्रथम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव येथे द्वितीय वर्षात शिकत असलेल्या भुषण भवर याने श्रीमंत शिवाजी राजे उद्यान विद्या व कृषी महाविद्यालय फलटण जिल्हा सातारा येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकविले.

या स्पर्धेत महात्मा फूले कृषी विद्यापिठ राहुरीच्या संलग्नित अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवुन आणणे हाच या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेत भुषण भवर या विद्यार्थ्याने २१ व्या शतकातील कृषी क्षेत्रात तरुणांचा सहभाग आणि नवकल्पना या विषयवार निबंध लिहुन प्रथम पारितोषिक पटकविले. या यशाबद्दल प्राचार्य डॉ.पी.आर.सपकाळे, उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके, डॉ. ललीत जावळे व प्रा.एन.डी.पाटील यांनी अभिनंदन केले.

 

Protected Content