२०२४ मध्ये पवारांचे विसर्जन करायचे आहे ! : पडळकर घसरले

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज बारामतीतल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलतांना शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौर्‍यावर असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीदरम्यान बोलत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसल्याचे दिसून आले. ते म्हणाले, आपण सर्वजण ज्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करतो, त्याप्रमाणे त्याप्रमाणे २०२४ मध्ये पवारांच विसर्जन करायचं आहे. त्यासाठीच आज बारामतीत आलो आहे. आपण जिल्ह्यात संघटन टिकवलं आहे, विश्वासघाताने आलेलं सरकार टिकले नाही.

पडळकर पुढे म्हणाले की, बारामतीकरांना लुबाडून घेण्यात फार आनंद आहे. विश्वासघाताने सरकार आलं तेव्हाच्या अधिवेशनावेळी सुप्रिया सुळे वरमाईप्रमाणे नटल्या होत्या असं वक्तव्यही पडळकरांनी केलं आहे. पडळकर म्हणाले की, पावारांनी जनता आता सक्तीच्या विश्रांतीवर पाठवेल, ५० वर्षे तुम्ही खूप सेवा केली आता बास अशी टीकाही त्यांनी पवारांवर केली.

Protected Content