Home धर्म-समाज सेवानिवृत्त जवानांचे राखी बांधून स्वागत

सेवानिवृत्त जवानांचे राखी बांधून स्वागत

0
88

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतमातेची सेवा करून निवृत्त होऊन घरी परतलेल्या दोन जवानांचे राखी बांधून स्वागत करण्यात आले.

या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळ येथील रहिवासी सागर मोरे आणि सुवर्णसिंग राजपूत हे भारतीय सैन्यदलातील (बीएसएफ) तब्बल २० वर्षे सेवा बजावून निवृत्त होऊन घरी परतले. रेल्वे स्थानकावरच त्यांचे राखी बांधून स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र रक्षक सेना ग्रुपच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व दक्षता समिती सदस्य सविता माळी, राजश्री सोनवणे तालुका समूह संघटक बीसीएम आरोग्य विभाग भुसावळ, निरंजना तायडे सुप्रभात सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचालिका उपस्थित होत्या. या अनोख्या स्वागताने दोन्ही जवान व त्यांचे कुटुंब भारावल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound