भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सिंधी कॉलनीत संत बाबा तुलसीदास उदासी यांचा तीन दिवसीय वर्षी महोत्सव सुरू होत असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, सिंधी कॉलनीतील पूज्य बाबा काशिदास उदासी दरबारात शनिवारपासून दि.२१ पासून वर्षी महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शनिवारी सकाळी ८.३० ते १०.३० वाजेदरम्यान गुरुद्वारा साहीब भुसावळ येथील भाई गोविंदसिंग यांचे कीर्तन होईल. सकाळी ११ वाजता अखंड पाठसाहीब वाचनाला सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजता बाबा तुलसीदास म्युझिकल पार्टीचा भजनांचा कार्यक्रम होणार आहे.
यानंतर रविवार दि. २२ मे रोजी सकाळी ९ वाजता ५५ बालकांचे सामूहिक उपनयन (जाणिया) संस्कार होतील. सायंकाळी ७ वाजता धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. यानंतर सोमवार दि.२३ मे रोजी सकाळी ८.३० ते १०.३० दरम्यान शब्द कीर्तन, सकाळी ११ वाजता अखंड पाठसाहीब वाचनाची समाप्ती, दुपारी १ वाजता वर्षी उत्सव, नंतर बाबा तुलसीदास बाबा काशिदास उदासी भक्त निवासात महाभंडारा होणार आहे. या कार्यक्रमासाठी अचूक नियोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.