भुसावळ प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात नवीदिल्ली येथील तीस हजारी कोर्टाच्या आवारात दिल्ली पोलिसांकडून वकीलांना आमानुष मारहाण करून त्यांच्या वाहनांचे नुकसान करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र व गोवा बार असोशिएशनतर्फे काळया कोटावर लाल फिती लावून निषेध करण्यात आला. त्यामध्ये शहरातील तालुका वकील संघातर्फेही निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी सदस्य कार्यकारणी विजय तायडे, दिपक पाटील, विश्वंगर वाणी, वैशाली साळवे यांच्यासह आदि वकिल बंधू आणि भगिनी उपस्थितीत होत्या.