जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पी.ओ. नाहटा महाविद्यालय, भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नाहाटा महाविद्यालय येथे राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मेळाव्यासाठी विविध खाजगी आस्थापनांनी रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास/नापास, 12 वी पास, आयटीआय पास, पदवीधर, डिप्लोमा/ॲग्री डिप्लोमा अशी आहे. उद्योजकांना विविध रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्यास उपस्थित रहावे. रोजगार मेळाव्यास उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बायाडाटा, पासपोर्ट फोटो, इत्यादि कागदपत्रांसह 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता अनिसा तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.