भुसावळ रेल्वेस्थानक परिसरात १०० फुटांवर फडकला तिरंगा !

0
37


भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात आज सकाळी १०० फुट उंचीवर तिरंगा झेंडा फडकावण्यात आला.

खासदार रक्षाताई खडसे यांनी रिमोटचे बटन दाबून राष्ट्रध्वज फडकावला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, डीआरएम आर. के. यादव, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, विस्तारक दिनेश नेमाडे, सतीश सपकाळे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील यांची उपस्थिती होती. या राष्ट्रध्वजाचे वजन २० किलो असून याला इलेक्ट्रीक मोटरच्या सहाय्याने १०० फुट उंचीवर फडकावण्यात आले.

अलीकडच्या काळात भुसावळ रेल्वेस्थानक परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्यात आला आहे. रेल्वेच्या प्रवेशद्वारावर अलीकडेच भव्य रणगाडा ठेवण्यात आला असून आता १०० फुटांच्या उंचीवरील राष्ट्रध्वज डौलाने फडकणार असून यामुळे रेल्वे स्थानक परिसराच्या सौदर्यात भर पडणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here