भुसावळात रेल्वे वस्तुसंग्रहालयाचे लोकार्पण ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । येथे रेल्वे वस्तू संग्रहालय आणि उद्यानाचे लोकार्पण आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले.

शहरातील अमर स्टोअर्स समोरील रेल्वेच्या जागेमध्ये रेल्वे वस्तु संग्रहालय उभारण्यात आले आहे. येथे रेल्वेच्या विकासातील विविध टप्पे अतिशय आकर्षक पध्दतीत सादर करण्यात आले आहेत. विशेष करून येथील मॉडेल रेल्वे हे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनणार आहे. तसेच या संग्रहालयात अनेक दुर्मीळ वस्तूंचा समावेश असल्यामुळे सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांच्याहस्ते या वस्तूसंग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी डीआरएम आर. के. यादव, मुख्य परिचालन प्रबंधक डी.के. सिंग, मुख्य यांत्रिक अभियंता मनोज जोशी ,मुख्य विद्युत अभियंता एस. पी. वावरे, मुख्य कार्मिक अधिकारी श्री स्वामिनाथन, मुख्य संरक्षा अधिकारी पी भुटानी, मुख्य भंडार अधिकारी आदित्य शर्मा, मुख्य ट्रॅक अभियंता अश्‍विन सक्सेना, अप्पर मंडळ प्रबंधक मनोज सिन्हा, वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर के शर्मा, वरिष्ट मंडळ परिचालन प्रबंधक स्वप्नील निला, वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता रामचंद्रन, वरिष्ठ मंडल अभियंता राजेश चिखले, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता जी के लखेरा, मंडल सुरक्षा आयुक्त श्री दीक्षित आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पहा : भुसावळातील रेल्वे म्युझियमच्या लोकार्पणाचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content