आगामी निवडणुकांमध्ये पीआरपी स्वबळावर लढणार ! : जोगेंद्र कवाडे

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पीआरपी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथील मेळाव्यात केली.

शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात पीपल्स रिपब्लीकन पक्षाचा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, पीआरपी प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे, माजी नगरसेविका पुष्पा सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन, प्रदेशाध्यक्ष गणेश सोनवणे, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष आरीफ शेख, गोपी साळी, जयराज पुरभी, चंदू पहिलवाल, सचिन बार्‍हे, चरणदास इंगोले, विलास निकाळे, सुरेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने आगामी कालखंडात होणार्‍या नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत बोलतांना प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यात येणार असल्याची घोषणा केली. तर जगनभाऊ सोनवणे यांनी भुसावळातील स्थितीवर भाष्य करत गोरगरिबांसाठी व्यापक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: