भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत असतांना शिवसेनेतर्फे मोफत नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
आजपासून ६० वर्षांवरील व्यक्ती व ४५ वर्षांहून अधिक वयाच्या गंभीर आजाराग्रस्त व्यक्तींना १ मार्चपासून लस दिली जाणार आहे. यासाठी शिवसेनेतर्फे नागरिकांची मोफत नोंदणी करून दिली जाणार आहे. याबाबत शिवसेनेने विठ्ठल मंदिर वॉर्डात जनजागृतीला प्रारंभ केला. रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित मुथा, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या उस्थितीत शहरप्रमुख बबलू बर्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, किशोर ठाकूर, गणेश पाटील यांनी या उपक्रमाची नागरिकांना सविस्तर माहिती दिली.
लसीकरणासाठी नोंदणी करताना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, चालक परवाना, पॅन कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, पेन्शन कागदपत्र, बँक, पोस्ट ऑफिस पासबुक यापैंकी कोणताही एक पुरावा आणि मोबाइल क्रमांक नोंदणीसाठी आवश्यक आहे. भुसावळात विठ्ठल मंदिर वॉर्ड, जुना सातारा व शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात कोरोना लसीकरणाची नोंदणी केली जात असल्याची माहिती बबलू बर्हाटे यांनी दिली आहे.