अखेर भुसावळात शवविच्छेदनाची सुविधा; डॉ. नि.तु. पाटील यांचा पाठपुरावा

भुसावळ प्रतिनिधी । भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तु. पाटील यांच्या पाठपुराव्याने अखेर शहरात शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळशहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये वैद्यकिय अधिकारी असले तरी शवविच्छेदनासाठी कक्ष नाही तर पालिका रुग्णालयात कक्ष आहे, मात्र डॉक्टर नाही. यामुळे भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी ग्रामिण रुग्णालसाठी पालिकेने शवविच्छेदन कक्षाची मागणी केली होती. पालिकेने ते उपलब्ध करुन दिल्याने आता किमान आठ ते दहा वर्षांनी शवविच्छेदन कक्ष सुरु केला जाणार आहे.

भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेन्टर हे मे महिन्यात कार्यान्वित झाले असून त्याठिकाणी सध्या प्रसुतीगृह सुरु आहे. ट्रामा सेंटरमध्ये शव विच्छेदन खोली बांधण्यात बाबत प्रस्ताव हा प्रगतीपथावर आहे. तोपर्यंत अपघात किंवा अन्य कारणांनी मृत झालेल्यांवर वरणगाव, जळगाव किंवा यावल येथे शवविच्छेदन करावे लागते. याबाबत जोपर्यंत ट्रामा सेंटरमधील शवविच्छेदन खोली बांधकाम होत नाही, तोपर्यंत पालिकेने खोली उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली होती. यानुसार शनिवारी उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे, डॉ. नी. तु. पाटील, वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर नितीन चौधरी आदींनी भेट देवून पाहणी केली.

दरम्यान, या आठवड्यात गुरुवारपर्यंत वीज पुरवठा, पंखे, ट्यूबलाईट व स्वच्छता करुन पालिका ही शवविच्छेदन खोली सुपुर्द केली जाणार आहे. यामुळे किमान ८ ते १० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेंटरमधील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर नितीन चौधरी यांना वरणगावाला शव विच्छेदनासाठी जावे लागले. त्यामुळे दुसरीकडे ग्रामिण रुग्णालय व ट्रामामध्ये येणार्‍या रुग्णांना ताटकळत राहावे लागते. मृतांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो, मृतदेहाचीही अवहेनला होते. मात्र आता पालिकेने शवविच्छेदन कक्ष उपलब्ध करुन दिल्यास हा प्रश्‍न सुटून दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया या प्रकरणी पाठपुरावा करणारे डॉ. नि.तु. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content