भुसावळ प्रतिनिधी । भोरगाव लेवा पंचायततर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी इच्छुकांच्या नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे.
सामाजिक समस्या व खर्चिक लग्न पद्धतीवर नियंत्रणासाठी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाठळसे, भुसावळ विभागातर्फे प्रथमच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नोंदणी करणार्यांचा विवाह सामूहिक सोहळ्यात वैदिक पद्धतीने होईल. संस्थेतर्फे प्रत्येक जोडप्यास गॅस शेगडी, मिक्सर आदी संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहेत.
सामूहिक विवाह सोहळ्यासाठी उपक्रम समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात चेअरमन आरती चौधरी, व्हाइस चेअरमन मंगला पाटील, जयश्री चौधरी, भोरगाव लेवा पंचायत अध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, माजी आमदार नीळकंठ फालक, अजय भोळे, रघुनाथ चौधरी, सुहास चौधरी, महेश फालक, शरद फेगडे, परीक्षित बर्हाटे, डिगंबर महाजन यांचा समावेश आहे.