भुसावळ प्रतिनिधी । आरटीओ कँपमध्ये बनावट उमेदवार उभा करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणातील संशयिताला अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, वाहन चालवण्याचे पक्का परवाना काढून देण्यासाठी आरटीओ शिबिरात बनावट उमेदवार उभा करुन व फॉर्मवर दुसर्याच व्यक्तीचा फोटो लावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. मोटार वाहन निरीक्षक घन:श्याम दिलीप चव्हाण यांना राजेश सिंधी उर्फ सुक्का याच्याकडील उमेदवारांच्या अर्जातील चेतन पांडुरंग पाटील याच्या फॉर्मवर दुसरा फोटो चिटकवल्याचे आढळले होते. या प्रकरणी २५ डिसेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणात महिनाभरापासून पसार असलेला संशयीत गणेश कौतिकराव ढेंगे (रा.जळगाव) याला शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे.