भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील अवैध शस्त्रांबाबत पोलीस प्रशासन ठोस कारवाई करत असल्याचे नमूद करत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी अवैध सावकारीबाबतही गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. या प्रकारचे गुन्हे गंभीर असून याचा कुणाला त्रास होत असेल तर न घाबरता समोर येऊन पोलिसात तक्रार करावी असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी शहरातील पत्रकारांशी बोलतांना पाच दरोडेखोरांना अटक केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून एक अवैध पिस्तुलासह अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणात कट्टे मिळत असल्याचा प्रश्न विचारला असता डॉ. मुंढे म्हणाले की, पोलीस प्रशासनाने अवैध शस्त्रांच्या विरूध्द मोठी मोहिम उघडली आहे. भुसावळात कोंबींग ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.
दरम्यान, भुसावळ शहरातील अवैध सावकारी हा देखील अतिशय गंभीर प्रश्न असून अलीकडेच एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. मुंढे म्हणाले. अवैध सावकारीबाबत कुणाला त्रास होत असल्यास न घाबरता समोर यावे. पोलीस यावर कार्यवाही करतील असे देखील त्यांनी नमूद केले.
खालील व्हिडीओत पहा डॉ. मुंढे नेमके काय म्हणालेत ते ?