भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जाम मोहल्ला भागातल्या मच्छीवाडा परिसरात महिलांच्या छेडखानीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जाम मोहल्ला भागातील मच्छी वाड्यात महिलेची छेड काढण्यावरून शुक्रवारी रात्री ९च्या सुमारास वाद झाले. त्यातून दोन्ही गटात हाणामारी झाली. या हाणामारीत तेहरीन नासिर शेख, रिजान शेख रहीम, शेख बिस्मिल्ला रहीम, इरफान शेख, रहीम शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. शेख इम्राम शेख रहीम (वय ३२, जाममोहल्ला, मच्छीवाडा) यांच्या फिर्यादीनुसार संशयित तेहरीन शेख, तोफिक शेख, उबेद शेख, आकिब शेख, जशीन शेख, फरीद मच्छिवाला यांची दोन मुले, सलमान (रा.जाममोहल्ला) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला. शेख इम्रान शेख रहीम व त्याच्या घरातील लोक हे संशयितांच्या घरातील महिलांची छेड काढतात, असा आरोप करून संशयितांनी शेख इम्रान यांना लोखंडी रॉड व डाव्या हातावर चाकू मारून जखमी केले. त्यांचा भाऊ रिजवान व बिस्मिल्ला यांच्यासह रहिम शेख यांच्या डोक्यावर रॉड मारून जखमी केले. असे या फिर्यादीत म्हटले आहे.
दुसर्या गटाकडून तेहरीन नासीर शेख यांनी फिर्याद दिली. रिजवान शेख उर्फ टिल्लू याने मावशीची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने त्याने लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी रिजवान शेख उर्फ टिल्लू, शेख इमाम शेख गफूर, शेख तौहीफ शेख इमाम, शेख बिस्मिल्ला शेख रहिम, गुड्डू, शेख इरफान शेख रहीम, शेख इम्रान शेख रहीम (सर्व रा.जाममोहल्ला, मच्छीवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून एपीआय मंगेश गोंटला पुढील तपास करत आहेत.