रावेर प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसतर्फे पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौर्यावर आले असतांना येथील काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन माजी जिल्हा अध्यक्ष राजू पाटील गोंडू महाजन यांच्या सह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, त्या निवेदनामध्ये निवेदनात दि २८ चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ऐनपूर, खिर्डी, निंबोल, विटवे, निंभोरासिम असे एकूण से २३ गावात ऐन कापणीवर आलेली केळी उध्वस्त होवून जवळपास ७५८ हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या तसेच इतर पिकांचे अतोनात नुकसान झालले आहे. बर्याच गावातील घरावरील छपरे उडून घरांची पडझड होवून बरेच कुटुंब उध्वस्त झालेले आहेत. तसेच खानापूर, अहिरवाडी, चोरवड, अजनाड, निरुळ, पाडला, अटवाडे, दोधा नेहेता या भागात देखील नुकसान झाले आहे. यापूर्वीही मागीलवर्षी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होवून देखील शेतकर्यांना मदत मिळालेली नाही. तसेच बर्याच शेतकर्यांना विमा कंपन्यांकडूनही पिक विमा रक्कम मिळालेली नाही. यामुळे आता तरी शेतकर्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकणात ज्या प्रमाणे मदत जाहिर केली त्या धर्तीवर आपण देखील शासनाकडून तात्काळ मदत जाहिर करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन देतांना जिजाबराव साहेबराव चौधरी- किसान सेल तालुका अध्यक्ष सूर्यभान रामू चौधरी ता अध्यक्ष सेवादल, किसन सपकाळ उपाध्यक्ष रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोडू रामदास महाजन आदी उपस्थित होते.