भुसावळ प्रतिनिधी | येथील पांडुरंग टॉकीज जवळील खान्देश हॉटेलमध्ये काउंटरवर दारू पित असतांना दोन जणांमध्ये शाब्दिकवाद झाला. वादात कटरच्या ब्लेडने विकास साबळे यांच्या गळ्याच्या नसा कापल्यामुळे जागीच मयत झाल्याची घटना रात्री १०:३० वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेचा ‘सीसीटीव्ही’ फुटेज ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या हाती लागले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर रोड वरील पांडुरंग टॉकीज जवळील खान्देश हॉटेलमध्ये परमिट रूममध्ये निलेश ताकते (रा. कॉसमॉस बँक, जुना सातारा) परिसरात राहत असून त्या ठिकाणी विकास साबळे (वय ३६ रा. गंगाराम प्लॉट ) येथील असून रेल्वे कर्मचारी आहे. दोघे खान्देश हॉटेलमध्ये दारू पित असतांना त्यांच्यामध्ये काही शाब्दिक वाद झाला.या वादात निलेश ताकते हा हातात धारधार कटर घेऊन विकास साबळे बसलेल्या जागी आला. कोणाला काही कळण्याच्या आत निलेशने विकासचा गळा कटरने कापला. तो जागीच मयत झाला. आरोपी निलेश ताकते याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी भेट देऊन झालेल्या घटनेची पाहणी केली.
पहा भुसावळातील खुनाचा सीसीटीव्हीमधील थरार