भुसावळ प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीतर्फे १५ वर-वधूंचा सामूहिक विवाह सोहळा शहरातील संतोषी माता हॉलमध्ये अतिशय उत्साहात पार पडला.
भोरगाव लेवा पंचायतीने गुरुवारी संतोषी माता हॉलमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यात १५ जोपडी लग्न बंधनात अडकली. भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेने यासाठी पुढाकार घेतला होता. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी एका जोडप्यासाठी ३० वर्हाडींना उपस्थितीची परवानगी होती.
या सामूहिक विवाह सोहळ्यात जळगाव जिल्ह्यासह यवतमाळ, पुण्यातील वधू-वरांचा समावेश होता. गुरूवारी सकाळपासूनच वधू-वरांकडील मंडळी संतोषी माता हॉलमध्ये एकत्र आले. तेथे सर्व विधी पार पडत दुपारी १२.१० वाजता विवाह लागले.यावेळी भोरगाव लेवा पंचायतीचे भुसावळ अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव डॉ. बाळू पाटील, उपक्रम चेअरमन आरती चौधरी, भागवत भंगाळे, सुरेखा भंगाळे, निलिमा जंगले, ज्ञानेश इंगळे, स्वागत अध्यक्ष सुहास चौधरी, महेश फालक, शरद फेगडे, डिगंबर महाजन, परिक्षित बर्हाटे, जयश्री चौधरी यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.
दरम्यान, सामूहिक विवाहापूर्वी सकाळी ८ वाजता उपक्रमाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी वधू-वरांचे समुपदेशन केले. विवाह लागल्यानंतर भोरगाव लेवा पंचायतीतर्फे नवीन जोडप्यांना गॅस शेगडी, दोन सिलिंडर, नवीन कपडे, मिक्सर यासह संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.
या सोहळ्याला भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश पाटील, रोहिणी खडसे-खेवलकर, माजी महापौर विष्णू भंगाळे, बी.के.चौधरी, भागवत भंगाळे, यादव बर्हाटे, सुरेखा भंगाळे, शालिनी पाटील, अशोक चौधरी, भाऊसाहेब फिरके, आर.एम.पाटील, राजेंद्र फेगडे, अर्चना फेगडे, दीपक चौधरी, प्रमोद धनगर, नीलेश भोळे, उल्हास महाजन, मनोज जावळे, संजय महाजन, ज्योत्स्ना बर्हाटे, गीता चौधरी, निला चौधरी, सीमा गाजरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.