Home Cities भुसावळ भुसावळात खडसे गटाला धक्का : माजी नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक अपात्र

भुसावळात खडसे गटाला धक्का : माजी नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक अपात्र

0
31

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांना आज अपात्र ठरविण्यात आले असून यामुळे एकनाथराव खडसे गटाला जोरदार धक्का बसला आहे.

२०१६ साली झालेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ या चिन्हावर रमण देवीदास भोळे हे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आले होते. त्यांच्यासोबत भाजपचे २५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यांची मुदत पुर्ण होण्यासाठी काही दिवस बाकी असतांना १९ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे यासाठी पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय दिला.

जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन नगराध्यक्ष रमण देविदास भोळे यांच्यासह नगरसेवक बोधराज दगडू चौधरी, अमोल मनोहर इंगळे, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी रमेश मकासरे, मेघा देवेंद्र वाणी, किरण भागवत कोलते, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे, सविता रमेश मकासरे यांना अपात्र करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound