भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील आराधना कॉलनीनजीक रेल्वे रूळांजवळ एका तरूणाचा मृतदेह आढळून आला असून याचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील टिंबर मार्केटच्या जवळ असणार्या आराधना कॉलनीजवळच्या रेल्वे रूळांच्या खाली आज दुपारी एका तरूणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतदेहाची स्थिती पाहता या तरूणाचा घातपाताने मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर शहर पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शहर पोलिस स्टेशनचे पो.नि.पडघन, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.