भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील वांजोळा रोडवर गावठी कट्टयासह आढळून आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संदर्भात वृत्त असे की, वांजोळा रोड भागात काही संशयित गावठी पिस्तूल बाळगून शस्त्र विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. यानुसार सोमवारी (दि.३१) रात्री ९ वाजता पोलिस पथकाने तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) व विजय संजय निकम (चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक केली. संशयितांकडून गावठी पिस्तूल व दुचाकी जप्त केली होती.
दरम्यान, अटक झाल्यानंतर या तिघांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. याप्रसंगी न्यायाधिशांनी या तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.